Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वेतन अधिक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे आठ शिक्षकांचे वेतन १० महिन्या पासुन रखडले





 वेतन अधिक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे १० महिन्यांचे वेतन रखडले,

वरणगांव (वार्ताहर ) जळगाव जिल्हयातील ०८ विशेष शिक्षकांचे वेतन वेतन अधीक्षक श्री. तडवी साहेब यांच्या मनमानी मुळे रखडले असल्याची माहिती विशेष शिक्षक वि . मु . कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .
सदरच्या आठ शिक्षका मध्ये वरणगांव परिसरातील शिक्षकांचा सामावेश आहे .

जिल्हयातील एकूण ०८ विशेष शिक्षकांचे वेतन अनूदान (१० महिने) गेल्या महिन्यात दि.१२/०२/२५ ( रोजी मा. वेतन पथक यांच्या खात्यात जमा आहे, सदर विशेष शिक्षकांनी अनेक महिन्यांपासून शासन स्तरावर निवेदन व आंदोलन करून अनुदान मिळवले. 
१७ महिन्या  पासून सदर विशेष शिक्षक वेतनांपासून वंचित असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
शासन स्तरावरून वेतन १५ दिवसांच्या आत अदा करण्याच्या सूचना मा. अधीक्षक यांना दिले आहे.

विशेष शिक्षकांचे वेतन मिळण्यासाठी
विशेष शिक्षक गेल्या १० दिवसांपासून वेतन पथक कार्यालयात दिवस भर बसून आहे. तरी सुध्दा अ दयाप वेतन झाले नाही. लवकरात लवकर संबंधिता नी याबाबत दखल घ्यावी वेतनाच्या निर्णय न घेतल्यास वेतन पासून वंचित व्यक्ती  मा. अधीक्षक साहेब वेतन पथक, जळगाव येथे परिवारासह आमरण उपोषण करणार आहोत.
असेही निवेदनात म्हटले आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.