Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोर युवा फाउंडेशन तर्फे थोरगव्हाण येथे वधू वर मेळाव्याचे आयोजन व मान्यवरांचा सत्कार

थोर सन्मित्र युवा फाऊंडेशन, थोरगव्हाणतर्फे वधू-वर परिचय मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन:अध्यक्ष उमाकांत बाऊस्कर .


थोरगव्हाण (ता. रावेर) – थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा तसेच समाजातील गुणवंत आणि अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार या नेत्रदिपक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम दि. ११ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार), सकाळी ९:३० वाजता डी. एस. देशमुख हायस्कूल, क्रीडांगण, थोरगव्हाण येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवर:

अध्यक्ष: सुनिल देविदास चौधरी (उद्योगपती, नाशिक)

दानशूर अन्नदाता: सुरेश पंढरीनाथ झोपे (पुणे)


सत्कारमूर्ती:

डॉ. दिपक अनंत बाऊस्कर (शिक्षणतज्ञ, ठाणे)

अनिल वामनराव पाटील (भरारी पथक दारूबंदी निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर)

प्रा. डॉ. शरतन अनिल चौधरी (शिक्षणतज्ञ, धुळे)

शरद वासुदेव पाटील (माजी सैनिक, माजी जूनियर कमिशन ऑफिसर, भुसावळ)


प्रमुख पाहुणे:

दिपक तुकाराम चौधरी (ऑटोमोबाईल इंजिनियर, पुणे)

डॉ. गणेश पंडित पाटील (ॲक्यूपंक्चरीस्ट, उल्हासनगर)

डॉ. पंकज सुरेश महाजन (एम.बी.बी.एस., खरगोन)

अभय मुरलीधर पाटील (सीनियर जनरल मॅनेजर, इंदौर)

ॲडव्होकेट भगवती नूरमल चौधरी (नोटरी एडवोकेट, भारत सरकार, सुरत)

पुष्कर जनार्दन पाटील (बी.ई., एक्झिक्युटिव्ह लीडरशिप, पुणे)

विलास रामचंद्र महाजन (शेतकरी, माजी सरपंच, फुलगाव)

संध्या सुधिर पाटील (ज्योतिषाचार्य, डोंबिवली)


कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:

 वधू-वर परिचय मेळावा – विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी
 गुणवंतांचा सत्कार समारंभ – समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्यांचा गौरव
सामाजिक संवाद व एकत्रीकरण – वेगवेगळ्या शहरांतील समाजबांधवांना एकत्र येण्याची संधी
 ११ वा वधू-वर मेळावा सूची प्रकाशन – विवाह इच्छुकांची अधिकृत नोंदणी

विशेष आयोजन व व्यवस्था:

या भव्य कार्यक्रमासाठी विशेष मंडप उभारणी, स्वागत समारंभ आणि सोयीस्कर व्यवस्था करण्यात आली आहे.

समाजबांधवांना आवाहन:

थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष उमाकांत वसंत बाऊस्कर, खजिनदार विलास माधव चौधरी आणि सचिव योगेश भागवत झोपे यांनी समाजातील बंधू-भगिनी, उपवर युवक-युवती तसेच नोकरी-व्यवसाय व शिक्षणानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.