Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


डी एस देशमुख विद्यालयात सुर्य नमस्कार दिन संपन्न

सूर्य नमस्कार दिन उत्साहात साजरा
डी. एस. देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग

थोरगव्हाण ता रावेर डी. एस. देशमुख विद्यालयात सूर्य नमस्कार दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक नंदकुमार चौधरी आणि मधुकर केल्हे उपस्थित होते. यावेळी राजेंद्र बाऊस्कर (योग शिक्षक )बंधूंनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक डी के पाटील यांनी मागदर्शन केले .

कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सूर्य नमस्काराचे महत्त्व अधोरेखित करत, उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित सूर्य नमस्कार करण्याचे मार्गदर्शन केले.

विद्यालयाच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने १२ आसनांच्या मालिकेचा सराव केला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग,  विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.