मुंजोबा यात्रा अट्रावल येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या "जोगेश्वरी पाणीपुरी" या स्टॉलसाठी उद्घाटन वरणगावचे एपीआय सन्माननीय खंडेराव साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न झाले होते . प्रा माधुरी चौधरी मॅडमू उपस्थित होत्या .नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या संकल्पनेच्या यशामागे संजय पंढरीनाथ चौधरी , युवराज कुरकुरे सर, आणि पवन चौधरी पोलीस पाटील अट्रावल यांचे मोलाचे सहकार्य आहे.
नव्या प्रयोगाची संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रुप संदेश आणि स्थानिक प्रचाराचा प्रभावी उपयोग करण्यात आला. स्थानिक तसेच यात्रेकरू नागरिकांनी या अभिनव प्रयोगाची प्रशंसा केली असून, पहिल्या भेटीनंतर पुन्हा ग्राहक या स्टॉलला भेट देत पानीपुरी वेगवेगळ्या फ्लेवर मधील आनंद घेतला.
पवन हेमंतराव चौधरी पोलिस पाटील अट्रावल यांनी सांगितले की पानीपुरी सारखा व्यवसाय आधुनिक पद्धतीने विशेषतःहा परिसरातील अभिषेक देशमुख पदवीधर मराठी माणूस धाडस करून सुरू करतोय यासाठी सहकार्य करणे काळाची गरज आहे या भावनेतून कोणालाही मोलाचे सहकार्य करत असतो.
स्टॉलच्या यशस्वी सुरुवातीसाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. पुढील काळातही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा दत्तात्रय देशमुख मुळगाव यावल ह . मु . जळगांव व्यक्त करण्यात येत आहे.
नावीन्यपूर्ण छोटे खानी स्वादिष्ठ चटपटीत पानीपुरी पसंतीला उतरलेल्या व्यवसायाला सर्व समाज बांधवांतर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .