सुवर्णकार मंडळ, आ नि वरणगाव तर्फे श्री विठ्ठल रखुमाई आणि संत शिरोमणी श्री नरहरी महाराज मूर्त्यांचा 19 वा वाढदिवस व संत शिरोमणी श्री नरहरी सोनार पुण्यतिथी दि 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि 15 फेब्रुवारी रोजी संत श्री नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. दिंडीत सर्व निर्माणी तील सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिला तसेच लहान मुलांनी विविध कलाकृती सादर केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री सुहास विभांडीक ( *कार्य समिती सदस्य BMS युनियन OFV* ) , सचिव श्री मनिष सोनार व श्री प्रकाश सोनार, श्री योगेश सोनार, श्री. मनोज अहिरराव, श्री.मधुकर दुसाने, श्री. योगेश चव्हाण, श्री. धनराज सोनार, श्री. प्रसाद सोनार श्री.भूषण भामरे, श्री. कल्पेश सोनार,श्री. सचिन सोनार श्री. निवृत्ती सोनार तसेच समजातील ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ बांधवांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच समजातील महिला वर्गाने सुद्धा एकी करून दिंडीत सहभागी होऊन पाऊली आणि टाळ यांच्या वर मंत्र मुग्ध होऊन हरी नामात विलीन होऊन दिंडीची शोभा वाढवली घरात हरी भक्तीत करून तसेच सर्व सुवर्णकार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.