Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह चे उद्घाटन

देशमुख विदयालयात व्यवसाय मार्गदर्शन सप्ताहाचे उद्घाटन संपन्

थोरगव्हाण येथील डीएस देशमुख हायस्कूल येथे इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे उद्घाटन दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना 1917) यांच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर प्रगतीशील शेतकरी , संचालक  नंदकुमार चौधरी सेवानिवृत्त कृषी अधिकारी मार्गदर्शक व संचालक चंद्रकांत पाटील संचालक उद्योजक (दुग्धव्यवसाय ) डेअरी फर्म थोरगव्हण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात व्यवसाय मार्गदर्शन समितीचे वाय. जे. कुरकुरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या सप्ताहाचे उद्दिष्ट व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. व्यवसाय मार्गदर्शन सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता योग्य दिशा देण्याचा दी एज्यूकेशन संस्थेचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत बाऊस्कर , संचालक चंद्रकांत पाटील , संचालक  नंदकुमार चौधरी , मुख्याध्यापक  एस एस वैष्णव  या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय संधी, कौशल्य विकास व शिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. सप्ताहात व्यवसाय क्षेत्र भेट , बँक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक उद्योजक यांना आमंत्रीत करण्यात आले आहे . या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्यांना करिअर बाबत सखोल कल बाबत माहिती मिळाल्याचे स्पष्ट झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवसाय मार्गदर्शन समिती शिक्षकवृंद यांनी कार्यक्रम यशस्वी केला . सप्ताह दिन विशेष दर्शनी फलक लेखन एस बी सपकाळे यांनी केले . या मार्गदर्शन सप्ताहाला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. समितीचे वाय जे कुरकुरे , टी.पी घुले , एन बी चौधरी , के पी चौधरी , सौ जे पी चौधरी यांची उपस्थिती लाभली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन बी चौधरी आभार वाय जे कुरकुरे यांनी केले .विद्यार्थी पालक यांनी या सप्ताहाचे स्वागत केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.