Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


टोणगांव जि.प शाळेत योजना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

*टोणगांव जि. प. मराठी शाळेत व्यवस्थापन समिती सदस्या योजना पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन*
भडगांव (प्रतिनिधी) :  टोणगांव येथील जि. प. मराठी शाळेत ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे अमृत महोत्सवी ध्वजारोहण स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती सदस्या मा. नगरसेविका योजनाताई पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधान सन्मान, निपुण प्रतिज्ञा व झेंडागीत नंतर शासकीय आदेशानाव्ये विविध सांस्कृतिक उपक्रमात काव्यवाचन, गितगायन,  निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य कला विष्कार आदी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. सदर प्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्गासह व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली बाविस्कर, मुख्याध्यापिका मिरा साळुंखे, उपशिक्षिका ज्योती साळुंखे, सुषमा पाटील, उज्वला पवार, प्रकाश पाटील, श्रुती पाटील तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.