Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जय गणेश जेष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत कायदे विषयक मार्गदर्शन

जय गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली .

 या सभेत प्रमुख वक्ते जेष्ठविधीज्ञ श्री सुरेश झारखंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते जेष्ठ कायदा व वारसा प्रमाण पत्र इत्यादी विषयावर व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी प्रथम श्री झारखंडे यांचे शुभ हस्ते गणेशाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले

 तसेच स्वर्गीय मांडाळकर सरांच्या प्रतिमेस माल्यार्पण  करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री बावस्कर होते प्रसंगी एडवोकेट सुरेश झारखंडे यांचा श्रीफळ शाल पुस्तक व स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प भेट देऊन सत्कार करण्यात आला .
 ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री डी एस पाटील यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला त्यानंतर श्री झाडखंडे यांनी अनुभव संपन्न व्याख्यानात महाराष्ट्र आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याणासाठी नियम 2010 च्या तरतुदी व हिंदू वारसा प्रमाणपत्र मिळणे बाबतच्या तरतुदी तसेच हिंदू वारसा कायद्याप्रमाणे न्यायालयाकडून मिळणारा वारसा दाखला हिंदू मृत्युपत्र अधिनियम तसेच जन्म नोंदणी कायदा इत्यादी संदर्भात सखोल माहिती दिली त्याप्रमाणे हिंदू विवाह कायद्याच्या तरतुदीप्रमाणे फारकत सहमतीची फारकत    नाँदवण्यास येण्यासाठीचा अर्ज त्याचप्रमाणे हिंदू दत्तक कायदा व निर्वाह कायदा याबाबत सविस्तर सांगितले ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे वारसाविरुद्ध मा उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे कलम पाच प्रमाणे निर्वाह भत्ता मिळणेसाठी  अर्ज करता येतो नवीन सुधारित कायद्याप्रमाणे कलम 24 मध्ये निर्वाह भत्ता  न दिल्यास द्रव्य दंडाची तसेच तीन महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे     मृत्युपत्राबाबतच्या सखोल तरतुदी कायदेशीर भाषेत समजून सांगण्यात आल्या अध्यक्ष श्री बावस्कर यांनी सविस्तर आणि किचकट माहिती सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल प्रमुख पाहुणे यांचे संघातर्फे आभार मानले सभेचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री दिलीप तिडके यांनी केले संघाचे सल्लागार श्री पोपट पाटील यांनी आभार प्रदर्शन केले या सभेचे छायाचित्रण श्री डी एस पाटील यांनी केले पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकारीणी व सर्व सदस्यांना सहकार्य केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.