सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
वाडे तालुका भडगाव फलोत्पादन पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प सन 24-25 अंतर्गत केळी पिकाची शेतीशाळा श्री संजय सोनवणे , नाशिक येथील विभागीय पर्यवेक्षण अधिकारी यांचे उपस्थितीत उत्साहाने पार पडली. .कार्यक्रमाची रूपरेषा अनिल तायडे कृषी सहाय्यक यांनी विशद करून पाणी व्यवस्थापन ,कांदेबाग लागवड ,केळी करपा, पोंगासड इत्यादी कीड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले तसेच श्री तायडे यांनी राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधन संस्था, हैद्राबाद यांनी निर्माण केलेल्या फळमाशीचे नियंत्रणासाठी मेथाईल युजीनॉल कामगंध सापळा घरगुती पद्धतीने तयार करून दाखवून त्याचा वापर व फायदे सांगितले ,मेथाईल युजीनॉल सापळा घरीच बनविल्यास फक्त रुपये वीस मध्ये बनविता येतो ,यासाठी एक बिसलेरी रिकामी बॉटल, जीआय वायर ,दोरीचा तुकडा व औषधीचा वापर केला जातो.
केळी उत्पादक शेतकरी बांधवांनी आत्मा अंतर्गत केळी उत्पादक गट स्थापन करून ,गटाचे फायदे तालुक्याचे आत्मा बीटीएम अमोल सोनवणे यांनी सांगितले. वाडे परिसरातील शेतकरी उच्च प्रतीचे केळी उत्पादित करत असून शेतकऱ्यांनी आता केळी प्रक्रिया उद्योग व निर्यात कशी करता येईल याकडे लक्ष वेधून पाहिजे असे मत पी एन खाडे यांनी केले. एस बी गिरी कृषी सहाय्यक यांनी बीज प्रक्रिया करून दाखविली व महत्त्व व फायदे सांगितले तसेच विभागीय कृषी पर्यवेक्षकीय अधिकारी श्री संजय सोनवणे व
इफको कंपनीचे प्रतिनिधी केशव शिंदे व टीमने नॅनो युरिया, नॅनो डीएपी सागरीका इत्यादी उत्पादनांचे महत्त्व व वापर सांगून शेती सांगितले
.