भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ज्ञानज्योती विद्यालय खडका येथे सुरू असलेल्या विशेष हिवाळी शिबिरात दि.17 डिसेंबर रोजी एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.
त्यात स्वयंसेवकांनी गावकऱ्यांना एड्स जनजागृती संदर्भात विविध घोषणा दिल्या. एड्स जनजागृती वर पथनाट्य सादर करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला .कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.पी.निळे, महिला कार्यक्रमाधिकारी सौ.एस.के.चौधरी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.फेगडे प्रा.एस.एल.महाजन, प्रा.एन. एस.गवळी आदी उपस्थित होते.