Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कर्मचारी महिलेचा विनयभंग करणारा शिंदखेडचा विस्तार अधिकारी अखेर निलंबित

महिलेचा विनयभंग  करणारा विस्ताराधिकारी अखेर निलंबित
शिंदखेडा - तालुक्यातील ३९ वर्षीय महिला ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेविका) कडे शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी संतोष सावकारे यांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी आयएस अधिकारी तथा प्रभारी गटविकास विकास अधिकारी बी. सरवनन यांनी सावकारे यांना बुधवारी (ता. ४) निलंबित केले आहे.
शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात २८ नोव्हेंबरला ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी संतोष सावकारे यांनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ३९ वर्षीय महिला ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेविका) यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील भाग-२ च्या पोटनियम ३ (२) मधील तरतुदीनुसार अधिकारान्वये विस्ताराधिकारी सावकारे यांना जिल्हा परिषद सेवेतून विस्ताराधिकारी (ग्रापं.) या पदावरून निलंबित करण्यात येत आहे. पुढील चौकशी पारदर्शक होणेकामी सावकारे यांचे निलंबन काळातील मुख्यालय हे धुळे पंचायत समिती ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.