*मुक्ताईनगर प्रतिनिधी* आज 3 डिसेंबर 2024 जागतिक राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष व प्रहार दिव्यांग सेनेचे तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून या दिवशी पूर्ण तालुक्यातील दिव्यांक बांधवांना राष्ट्रीय योजनेमध्ये त्वरित सामावून घेणे त्यांना एक वर्ष प्रतीक्षेत न ठेवता किमान 90 दिवसात ऑनलाईन करून ती योजना कार्यान्वित करावी संजय गांधी निराधार मानधन योजनेमध्ये प्रकरण मंजूर करण्यासाठी चार-पाच महिने न लावता दिव्यांग प्रमाणपत्र पाहून किमान दीड महिन्यातच मानधन पगार दिव्यांगांना चालू करावा उत्पन्न दाखला किमान 50000 पर्यंत मान्यता द्यावी हेच जागतिक राष्ट्रीय दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रहार दिव्यांग सेनेतून पत्रातून मागणी करण्यात येत आहे उपस्थित मनसेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई दिव्यांग प्रहार सेनेचे तालुका अध्यक्ष उत्तम भाऊ जुमडे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाटील छगन भाऊ कोळी दिव्यांक बंधू इम्रान पिंजारी संभाजी पारधी रामभाऊ शिंदे यावेळी उपस्थित होते निवेदन स्वीकारणार अवलकारकून ए एन् चौधरी साहेब महसूल मुक्ताईनगर यांना देण्यात आले त्वरित पत्राची अंमलबजावणी करावी या दिनानिमित्त दिव्यांकांना न्याय द्यावा अशी यामध्ये मागणी केलेली आहे