Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगाव तालुक्यात गोवर्धन पुजेचा उत्सव साजरा

गिरणा परीसरात  गोवर्धन पुजेचा उत्सव साजरा. 

[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]

गोवर्धन पर्वताची प्रजेने पुजा करताच संतप्त इंद्रदेवाने सारे जलमय , विध्वंस होण्यासाठी पाऊस पाडला. श्रीकृष्णाने चक्क गोवर्धन पर्वत हाताच्या करंगळीने अलगद उचलुन पर्वताखालील प्रजेला आश्रय दिला. गोकुळ नगरीत आनंदोत्सव झाला. पौराणिक आख्यायीकेचा आजही जुने जाणकार मंडळी गोडवा गात आहेत. गोकुळाचा तो दिवस आजही गोवर्धन पुजनाने आठवणीत राहत आहे. 
असा हा गोवर्धन पुजेचा उत्सव बलिप्रतिपदेच्या दिवशी दि. २ रोजी शनिवारी  सकाळी ११ वाजेच्या सुमारास भडगाव, चाळीसगाव, पाचोरा यासह गिरणा परीसरातील बहुतांश गावांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.  साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानले जाते. तसेच वसुबारसनिमित्त ममतेचे प्रतीक असणार्या गोमातेचे पुजनही मोठया उत्साहात करण्यात आले.  परदेशी, राजपुत समाजासह काही इतर समाजातही परंपरागत गोवर्धन पुजेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.हा उत्सव भडगाव तालुक्यातील वाडे, नावरे, मळगाव, बांबरुड प्र. ब, सावदे, घुसर्डी खुर्द, वडजी, रोकडे, महिंदळे, भडगाव, पिंपळगाव बुद्रुक, भट्टगाव  टेकवाडे खुर्द, बहाळ व   लोहटार यासह पाचोरा तालुक्यातील बहुतांश गावांना गोवर्धन पुजा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
गोवर्धन उत्सवाच्या दिवशी परंपरेनुसार सारा परीवार सकाळपासुनच जोमाने तयारीला लागल्याचे चिञ दिसुन आले . माणसाकृती पुतळयाला लागुन बालकाकृती छोटा जवळपास ३ फुटाचा शेणाचा पुतळा उभारला होता. या शेणापासुन साकारलेल्या पुतळयांना गोवर्धन म्हणतात.    शेतातील ज्वारीचे तोटे किंवा ऊसाचे ४ ते ५ तोटे आणुन गोवर्धनाभोवताली ज्वारी किंवा ऊसाचे धांडे उभे करण्यात ( गोवर्धनाच्या ) मध्यभागी ताक घुसळण्याची रवी, रही धांडयाच्या मध्यभागी लाल कापडाने बांधली. आणि परदेशी, राजपुत समाजासह इतर शेतकरी परीवारामार्फत  या गोवर्धनाची मनोभावे पुजा अर्चा करण्यात आली.यावेळी बैलाची जोडी सजवुन  बैलांची पुजा  मालकासह धन्यासह जोडीने ९ किंवा ११ फेर्या मारण्यात आल्यात. 
शेणापासुन तयार केलेला भव्य पुतळा म्हणजे गोवर्धन होय. इंद्राने केलेल्या अतिवृष्टीपासुन कृष्णरुपी गोवर्धन पर्वताने लोकांना वाचविले. याच मनुष्य ऋणातुन मुक्त होण्यासाठी गोवर्धनाची मोठया आनंदाने उत्साहवर्धक वातावरणात मनोभावे पुजा, अर्चा केली जाते.. दिपवाळीनंतर दुसर्या दिवशी बलीप्रतिपदेला  हा गोवर्धन पुजा उत्सव परदेशी, राजपुत समाजासह इतर समाजात मोठया उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे राजपुत समाजाचे अध्यक्ष पत्रकार श्री. अशोकबापु परदेशी दिले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.