मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.सावकारे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या प्रसंगी समाज बांधवांनाही मतदान करण्याबाबत आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
समाजाचे विविध प्रश्न सुद्धा यावेळी मांडण्यात आले व ते सोडवून घेण्याबाबतही ठरले.
यावेळी मोहन फालक, अध्यक्ष नाहटा कॉलेज, डॉ. निलेश महाजन, दिनेश पाटील, सुनील भिरूड निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानज्योती विद्यालय खडके, चंद्रकांत बढे सर वरणगाव, अनिल वारके सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळ, उमेश नेमाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रमणभाऊ भोळे माजी नगराध्यक्षा, अजय भोळे, वासुदेव बोडे, नीलकंठ भारंबे, गोविंदा ढाके, दिपक फालक, विकास पाचपांडे, सुहास फालक, ज्ञानदेवशेठ झोपे वरणगाव, प्रभाकर पाटील, धीरज पाटील, संजय चौधरी, उल्हास बोरोले, राजेंद्र साहेबराव चौधरी तसेच लेवा समाजातील सर्व नगरसेवक, तसेच ग्रामीण भागातील समाजाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
या निर्णयामुळे संजय सावकारे यांच्या मताधिक्यात वाढ होणार असल्याचे संकेत आहे
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील.यांनी केले .