Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथील भावी नगरसेवक संतोष माळी भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

वरणगाव येथील समाजसेवक संतोष माळी यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार

वरणगाव - येथील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यात सदैव अग्रेसर असणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीराम माळी यांना भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे समाजसेवक म्हणून *भारत भुषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३"* देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा दिं.२५ नोव्हेंबर शनिवारी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे, उद्घाटक राजु सूर्यवंशी, उद्योजक मनोज बियाणी, 'तोंडाय आक्का" 'पैसेवाली ताई' फेम अहिराणी मराठी अभिनेत्री विद्या भाटिया, मराठी अभिनेता विकास महाजन (मुंबई) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अनुश्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे यांनी राज्यभरातून विविध क्षेत्रात निस्वार्थ सामाजिक काम करणारे ७१ समाजसेवक यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

संतोष माळी यांना 'भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३' मिळाल्याने माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, सेक्रेटरी नाना माळी, पंच श्रीकांत माळी, गणेश तुकडू माळी, प्रल्हाद माळी, बापू माळी, पांडू माळी, प्रवीण माळी, चेतन माळी, भूषण माळी, अनिल भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आशिष चौधरी, उपाध्यक्ष आशफाख काझी, भास्कर गवळी, शशिकांत चौधरी, संदीप वाघ, अतुल झांबरे, सुनील भोई, संजू कोळी, अजय पाटील, यांच्यासह शिवबा मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि 'आपला माणूस' मित्र परिवारातर्फे संतोष माळी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.