भुसावळ मधील न पा शाळा क्र 2 मध्ये शिकणारे बहुतांश मुलं ही वीटभट्टी कामगारांची मुलं आहेत .ही शाळा ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने दत्तक घेतली आहे .
दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण या मुलांनी सुद्धा आनंदात साजरा करावा या उद्देशाने क्लबने या मुलांसाठी दिवाळी फराळ व फटाके ची भेट दिली .या मध्ये शेव ,चिवडा ,लाडू ,टिकली रोल ,बंदूक ,फूल बाजी पाकिटे ,आपटी बार पाकिटे यांचा समावेश होता .या प्रोजेक्ट साठी क्लब सोबत अध्यक्षा रेवती मांडे ,सदस्य वैशाली महाजन यांनी अर्थ सहाय्य केले .कार्यक्रम प्रसंगी सचिव सीमा सोनार ,डॉ म्रुनाल पाटील ,सुनिताताई पाचपांडे,आदिती भडंग,प्रतीक्षा पाटील ,मोना भंगाळे,वनीता नेवे ,जयश्री चौधरी ,कोमल पाटील या ऊपस्थीत होत्या .