*मोफत रक्त तपासणी शिबिर🩸* *खेडगाव - तालुका भडगाव वृंदावन फाउंडेशन पाचोरा, राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, पिंपळगाव (हरे.) ग्रामपंचायत - खेडगाव व महाराष्ट्र शासन महाल्याब -यांच्या संयुक्त विद्यमाने* दिनांक: 01/11/2023 बुधवार रोजी सकाळी 9 वा. पासून शिबिर नोंदणी करण्यात आली.यात वेगवेगळ्या सहा प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या.साधारण या रक्त तपासण्या करण्यासाठी 3ते4 हजार रुपये खर्च येतो. या शिबिराच्या माध्यमातून महिलांची
*मोफत* रक्त तपासणी करण्यात आल्या. शिबीर स्थानी प्रमुख पाहुणे : डॉ. निळकंठ पाटील (अस्थीरोग तज्ञ) वृंदावन हॉस्पिटल संचालक, श्री दशरथ महाजन (महाल्याब - टेक्निशियन) ई.मान्यवर उपस्थित होते.यात
डॉ. निळकंठ पाटील सरांनी महिलांना "हिमोग्लोबिन व रक्तातील लोहाचे प्रमाण कसे वाढेल यासाठी लोखंडी कढई व लोखंडी तवा वापरणे चालु करा असे अवाहन केले व लोह शरीरासाठी कित्ती महत्त्वाचा घटक आहे आणी तो कशामुळे वाढु शकते हे अतिशय सोप्या भाषेत सांगितले. सामान्य महिलांना भावला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण माळी, (ग्रापं सदस्य) शरद हिरे (ग्रापं सदस्य )विजय पाटील भगवान पाटील (खेडगाव ) आदींनी परिश्रम घेतले