Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पिपरी हाट ग्रा पं कर्मचार्यावर अन्याय उपोषणाचा इशारा

पिंपरीहाट पंचायत कर्मचारी  यांचेवर अन्याय झाला आहे त्यांनी .बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे

भडगाव तालुक्यातील पिंपरी हाट गावाचे पाणीपुरवठा कर्मचारी श्री रविंद्र पाटील हे कायम कर्मचारी असून गेली कित्येक वर्ष गावाला चोख सेवा देत आहेत. तीन महिन्यापूर्वी  त्यांच्या मुलाचा व काही लोकात वाद झाल्याने त्यात मुलावर कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचारी च्या पोटावर लाथ मारण्यात आली. त्यातून त्यांना घरी ठेवण्यात आले. यासंदर्भात प्रत्येकाच्या घरी जाऊन तोंडी लेखी विनवणी केली आणि ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्यसचिव कॉम्रेड अमृत महाजन जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर महाजन  यांनी मध्यस्थी करून त्यांना कामावर घेण्याच्या बाबतीत खेळीमेळीने बैठक बैठकही घेतली.. त्यावेळी त्यांना. घेण्याचे आश्वासन  दिले.. प्रत्यक्षात त्यांना कामावर घेतले नाही हा अन्याय आहे. म्हणून शेवटी येत्या नऊ नोव्हेंबर रोजी श्री पाटील व त्यांची पत्नी ग्रामपंचायत समोर उपोषण करून न्यायासाठी लढा देणार आहेत..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.