Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बी आर एस पक्षातर्फे शेतकर्‍यांच्या केळी पिकाच्या नुकसान भरपाई साठी जिल्हा धिकारी यांना निवेदन

केळी पिकांची नुकसान भरपाई , प्रोत्साहन बाबत बीआरएस पक्षाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
शासन प्रशासनाने प्रलंबित प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करणार : जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी अण्णा 
जळगाव,  दिनांक 9 ऑक्टोबर 2023 
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई बाबत आणि नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना द्यावयाच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत असणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रलंबित समस्येबाबत भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे नेतृत्वात शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ यांनी जळगावचे
मा.जिल्हाधिकारी यांस निवेदन देण्यात आले. 

बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे नेतृत्वात यावेळी निवेदन देण्यात आले.  यावेळी जिल्हाधिकारी यांचे वतीने निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी निवेदन स्वीकारले. बीआरएस पक्षाचे भिकन सोनवणे , नितीन तायडे, कमलाकर पाटील, भगवान धनगर, नरेंद्र पाटील, भरत पाटील,महेंद्र पाटील, हिरामण पाटील,शांताराम पाटील, दिगंबर पाटील,छगन पाटील,बाळकृष्ण पाटील, प्रदीप पाटील,भागवत कोळी,प्रभाकर कोळी,विजय पाटील, साहेबराव पाटील,मंगल सपकाळे, रामदास चौधरी, ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत जयस्वाल, सुनिल सोनवणे, सचिन धुमाळ, नरेंद्र पाटील, निरंजन घुगे, सुधाकर राठोड, रवि राठोड यांचे सह शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

बघुया लकी अण्णा काय म्हणाले👉
https://fb.watch/nzz1x1updr/?mibextid=Nif5oz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.