पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा सहभाग
माननीय जिल्हाधिकारी यांनी नुकताच भुसावळ मुक्ताईनगर परिसराचा दौरा करून महसूल विभागाच्या बैठका घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून लोकांच्या असलेल्या समस्या रेशन बाबतच्या समस्या महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले .भुसावळ येथेही महसूल विभागाची तहसील कार्यालयात मीटिंग घेऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्याबाबत मार्गदर्शन केले
भुसावळ शहर तालुक्याचे महसूल विभागाचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचे असून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार नीता लबडे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले यानंतर तहसील कार्यालयासमोर असलेल्या यावल भुसावळ रोडवरील डिव्हायडर मध्ये पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील सुरेंद्र सिंग पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करून या दिवसाचे आठवणीच्या रूपात वृक्ष लावण्यासाठी आग्रह केला त्यावेळी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी माननीय जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे यांच्या शुभहस्ते डिव्हायडर मध्ये सात-आठ फुटांचे वृक्ष ट्री गार्ड सह लावण्यात आले यावेळी भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून व हरित शहर स्वच्छ शहर एक चांगली संकल्पना राबवत असल्याने नाना पाटील सर व टीम चे कौतुक केले . भुसावळ शहरात वृक्षारोपन करून संवर्धन करणे गरजेचे आहे . असे याप्रसंगी मनोगत व्यक्त केले . यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनीही माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी परिचय करून वृक्षारोपण कार्य व इतर उपक्रमांविषयीही माहिती दिली .वृक्षारोपण कार्यक्रमाला महसूल विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते