आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा सक्षम व्हावे व प्रत्येक व्यक्तीला निरामय आरोग्य जगता यावे याकरिता अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत 2300 पेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता.
लहान चिमुकल्यांचा किलबिल, तरुणांचा उत्साहपूर्ण जोष व वरिष्टांच्या सहभाग यामुळे अतिशय उत्कंठा पूर्वक वातावरणात ही हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ६.०० वाजताच सुरु झाली.
पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त मनपा आयुक्त आदी मान्यवरांनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून केली. २१ कि.मी. ही हाफ मॅरेथॉन जवाहरलाल नेहरु स्टेडीयम येथून सुरु झाली. या स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम पंचवटी चौक वेलकम पाईंट बियाणी चौक नेताजी कॉलनी - मार्डी - रोड परत विद्यापीठ परिसर परत बियाणी चौक वेलकम पॉईंट बियाणी चौक इर्वीन - चौक- राजकमल उडान पुल राजापेठ पोलीस स्टेशन पासून परत राजकमल उड्डान पुल. इर्वीन चौक • जिल्हा स्टेडीयम असा होता. १० कि.मी. पावर रन सकाळी ६.१५ वाजता लहान मुलांचा ५ कि.मी. व ५ किमी फीटनेस चॅलेंज ही स्पर्धा ६.३० वाजता सुरु झाली.
स्पर्धेदरम्यान सर्व स्पर्धकांकरीता ४ ठिकाणी स्पर्धेच्या मार्गावर एनर्जी स्थानक ठेवण्यात आले होते. या ठिकाणी स्पर्धकांकरीता एनर्जाल, पाणी, केळी इ. उपलब्ध होते. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना इजा झाल्यास किंवा इतर आपात परिस्थीती उद्भवल्यास ती हाताळण्याकरीता डॉक्टरांची चमु उपलब्ध होती. यामध्ये ३ रुग्णवाहीका, डॉक्टरांचे मार्गावर फिरते पथक, स्टेडियम वर रेनवो इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस या वैद्यकीय संस्थेच्या डॉक्टरांचे पथक हजर होते. स्पर्धेदरम्यान एखाद्या स्पर्धकाला अचानक काही त्रास झाल्यास ही परिस्थीती डॉक्टरांचे पथक त्या ठिकाणी येईपर्यंत कशा प्रकारे हाताळावी याचे प्रशिक्षण सर्व स्पर्धा अधिकान्यांना देण्यात आले होते.
२१ कि.मी. व १० किमी. मधील स्पर्धकांची अचुक वेळ नोंदविण्याकरीता व इलेक्ट्रॉनीक टायमींग चिपचा वापर करण्यात आला होता याकरिता स्पर्धेच्या सुरवातीला, मार्डी रोडवर नेताजी कॉलनी जवळ व राजापेठ पोलीस स्टेशन जवळ इलेक्ट्रॉनीक सेन्सर स्थानक उभारण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धक या चारही ठिकाणावरुन गेला किंवा नाही याची खातरजमा या व्दारे करण्यात आली.
स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडावी याचा भाग म्हणून ५० शारीरीक शिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना सिपना इंजीनीअरींग महाविद्यालयाच्या ३०/ स्पर्धेच्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी नेमण्यात आले होते. स्पर्धकांना स्पर्धेच्या मार्गाबाबत दिशा दर्शन, वाहतुक नियंत्रण व आपात परिस्थीती हाताळण्याचे कार्य या अधिकान्यांनी पार पाडली.
वस्तु व सेवाकर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्साहाने या स्पर्धेत सहभाग होता यामध्ये अमरावती, नागपुर, यवतमाळ, अकोला मुंबई येथील अधिकारी न कर्मचारी सहभागी झालेत.
अमरावती हाफ मॅरेथॉनला यावर्षी प्रथमच काही नामवंत कंपन्याचे प्रायोजकत्व लाभले. आयोजकातर्फे सर्व स्पर्धकांना ड्राय कीट टी शर्टस् पाचवी आवृत्ती विशेष पदक, टायमींग चीप पुरविण्यात आली.
स्पर्धेअंती सर्व गटातील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज व रोख बक्षीस देण्याकरीता बक्षीस वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता आयोजीत करण्यात आला होता. एकूण ३.२५ लक्ष रुपयाचे रोख बक्षीस सर्व विजेत्यांना देण्यात आले.