Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भगीरथी शाळेत आरोग्य विषयक जागृती व्याख्यान संपन्न इनरव्हील रेल सिटी या उपक्रम

*भागीरथी शाळा येथे आरोग्य  विषयक जागृती व्याख्यान संपन्न ..ईनरव्हील रेलसिटीचा ऊपक्रम ..(विद्यार्थ्यांना वाटले मोफत टूथब्रश आणि पेस्ट )..* 
दिनांक 7सप्टेंबर गुरुवार रोजी ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे सकाळी 11:00 वाजता भागीरथी शाळा ,सोनिच्छ वाडी ,जामनेर रोड ,भुसावळ येथे आरोग्य विषयक जागृतीपर व्याख्यान व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले .यास मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ मकरंद चांदवडकर व मेडिकल ऑफीसर डॉ कीर्ती चांदवडकर -भामरे हे उपस्थित होते
 .डॉ मकरंद यांनी दात  कसे ,कितीवेळा घासावे ,कितीवेळा गुळण्या कराव्या ,काय करू नये यांची आपल्यां खुमासदार शैलीत मुलांना माहिती सांगितली .डॉ कीर्ती यांनी हात पाय कसे धुवावे,कितीवेळा धुवावे ,आंघोळ कशी करावी ,केसांची व नखांची निगा ,कपडे घालण्याची पद्धत,आहारात काय खावे काय खाऊ नये या बद्दल प्रात्यक्षिक करून मुलांना माहिती सांगितली व हसत खेळत नियम म्हणून घेतले .
या प्रसंगी ईनरव्हील च्या डिस्ट्रिक्ट 303 च्या चेअरमन सौ शीला देशमुख ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या .कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .व्याख्यानानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व 200 मुलांना टूथब्रश आणि पेस्ट मोफ़त  वाटण्यात आली .
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सौ रेवती मांडे ,सचिव सीमा सोनार ,प्रोजेक्ट चेअरमन जयश्री चौधरी व सर्व ईनरव्हील सदस्यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.