Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे राधाकृष्ण प्रभात फेरी परिवाराने केला शिक्षकांचा सन्मान

*श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवाराने केला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे

भुसावळ येथील श्री राधाकृष्ण परिवार परीवार फेरीच्या वतीने 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून भुसावळ शहरातील सेवानिवृत्ती मुख्याध्यापक जगदीशजी सुचिक सेवानिवृत्ती मुख्याध्यापक प्रकाश विसपुते अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे व हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना राबवणारे नाना पाटील सर डी एल हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोज माहेश्वरी सर आयुर्वेद महाविद्यालयाचे सेवानिवृत्ती प्राचार्य द्विवेदी सर प्रा.सौ शुभांगी राठी  सी एस असलेल्या संजीवनी लाहोटी सेवानिवृत्त प्रा.निलेश अग्रवाल प्रा.तथा माजी नगरसेवक दिनेश राठी  प्रा .दिपक मंत्री या सर्व शिक्षक बंधू-भगिनींचा सकाळी प्रभात फेरी संपल्यानंतर राम मंदिरात शाल श्रीफळ बॅग देउन सन्मान व कार्याचा गौरव करण्यात आला .
या कार्यक्रमाच्याआयोजनाबाबत  प्रभात फेरीचे आदरणीय राधेश्यामजी लाहोटी यांनी गुरूंविषयी असलेली आस्था भक्ती व या दिनाचे महत्त्व आपल्या भावनेतून व्यक्त केले .यानंतर शिक्षकांच्या वतीने जगदीश जी सुचीक यांनी गुरूंचे महत्त्व सांगताना हनुमान जी श्रीराम यांचे विविध उदाहरणे देऊन गुरूंचे महत्त्व विशद केले व सनातन धर्म संस्कृती टिकविण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले
 नाना पाटील सर यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने  प्रभात फेरीच्या प्रमुखांना प्रातिनिधीक स्वरूपामध्ये या दिनाची स्मृती रहावी म्हणून आवळ्याची रोप भेट देउन आभार मानले . कार्यक्रम अतिशय प्रसन्न वातावरणात व उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रभात फेरीचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.