आले आहे
भुसावळ तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन दिपनगर ता भुसावळ येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते यावेळी शारदा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भ्रमित या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे
तालुकास्तरीय नाट्योत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्याध्यापक ए व्ही झोपे होते यावेळी पर्यवेक्षक जे बी पाटील माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक संजय भटकर विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे तालुका सहसमन्वयक नीलिमा पाटील विषय तज्ञ शिक्षक संजय गायकवाड सचिन पाटील आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. संजय भटकर यांनी प्रास्ताविक केले तर सुनील वानखेडे यांनी विज्ञान नाट्योत्सवाची गरज व हेतू सांगताना म्हणाले की मनोरंजनातून ग्रामीण भागामध्ये वैज्ञानिक संकल्पना पोहोचल्या पाहिजे विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे यासाठी विज्ञान नाट्यत्सवाचे आयोजन करण्यात येते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक झोपे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कारण मीमासा केली पाहिजे त्यामधून स्वतःचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत केला पाहिजे व इतरांची देखील जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले
या नाट्यत्सवामध्ये श्री शारदा माध्यमिक विद्यालयाच्या चमुने प्रथम क्रमांक मिळवला तर वरणगाव येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रूपाली राणे यांनी केले