Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोर सन्मित्र युवा फाउंडेशनची बेबसाईट सुरु

थोरगव्हाण येथील थोर सन्मित्र युवा फाउंडेशन ची बेब साईट सुरू झाली असुन सचिव योगेश झोपे यांनी या बाबत माहीती दिली आहे
मी श्री योगेश भागवत झोपे सचिव थोर सन्मित्र युवा फाउंडेशन थोरगव्हाण म्हणून थोरगव्हाणकर लेवा पाटील समाज बंधूंशी आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या वेबसाईट बाबतची माहिती देण्यासाठी आपल्या समोर आलो आहे*...
     *माझ्या प्रिय समाज बंधुं भगिनींनो ही वेबसाईट निर्माण करण्याची गरज का निर्माण झाली. तर फाउंडेशन तर्फे गेल्या अनेक वर्षापासून समाजातील वधू वर पालकांना वधु -वर निवड करणे सुकर व्हावे , वधु व वर यांना प्रत्यक्ष एकमेकांना पाहता यावे त्यातून त्यांना एकमेकांचा परिचय व्हावा , या निमित्ताने समाज बांधव एकत्र येऊन ऋणानुबंध जोपासले जावे यासाठी वधू - वर सामाजिक मेळाव्याचे  श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रेच्या एक दिवस आधी वधू -वर मेळावा समाज बांधवांच्या सहकार्याने भव्य- दिव्य पद्धतीने संपन्न होत असतो. मेळाव्या साठी आता पर्यंत वधु - वर नोंदणी फॉर्म ऑफलाइन ( कागदी फॉर्म) पद्धतीने भरला जात होता परंतु यामध्ये अडचणी होत होत्या त्यात अचूकता यावी म्हणुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून वेबसाईटच्या माध्यमातून अडचणी कायमच्या सोडवल्या जाऊ शकतात हा विचार पुढे आला आणि त्यातूनच वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. *यापुढे वधुवर यांची नोंदणी केवलऑनलाईन पद्धतीने डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट थोरगव्हाण फाउंडेशन कॉम* *याच वेबसाईटवर होईल अन्य इतर कोणत्याही प्रकारे होणार नाही याची वधू-वर पालकांनी नोंद घ्यावी . ही माहिती मला समाज बांधवांना सांगताना अतिशय आनंद होत आहे*...
 *सदरील वेबसाईट आम्हाला आपले समाज बांधव हायक्लोनाईड सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड नासिक चे डायरेक्टर श्री प्रथमेश जगदीश महाजन यांनी नाममात्र फी घेऊन अथक परिश्रमांनी तयार करून दिली आहे. श्री प्रथमेश महाजन हे श्री जगदीश वसंतराव महाजन समाजसेवा, धार्मिक व्यक्तिमत्व तथा सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर जलसंपदा विभाग नाशिक यांचे सुपुत्र आहेत. यांचे अनमोल सहकार्य मदत असल्यामुळेच आम्हाला वेबसाईटचे माध्यमातून आपल्यापर्यंत सेवा देण्यासाठी पोहोचणे शक्य होणार आहे .सदरील .वेबसाईट डेव्हलपर यांचे मी फाउंडेशन सचिव या नात्याने थोर सन्मीत्र युवा फाऊंडेशन तर्फे मनपूर्वक आभार मानतो. डी. एस . देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथील श्री के. पी.चौधरी सर वेबसाईट सहाय्यक म्हणून काम पाहणार आहे*  ...
*या वेबसाईट मध्ये काय आहे तर या वेबसाईट मध्ये वधू- वर नोंदणी, नामावली सूची, व्यावसायिक व इतर सर्व समाज बांधव यांचे साठी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जसे जाहिरात ,व्यवसाय, विविध उत्पादनांची माहिती इत्यादी*..

 *सर्व समाज बांधवांना नम्र विनंती की, सदरील वेबसाईट मधील नामावली सुचित प्रत्येक कुटुंब प्रमुखाने रजिस्ट्रेशन करून आपल्या कुटुंबाची माहिती भरावी जेणेकरून प्रत्येक समाज बांधवाला समाजातील प्रत्येक व्यक्तीची उपयुक्त माहिती मिळेल, नोकरी व्यवसाया निमित्त मूळ गावापासून दुर शहरात गेलेल्या समाज बंधूंची समाजा प्रती नात्याची घट्ट वीण तयार होईल त्यामुळे समाज एकसंघ राहण्यास निश्चित मदत होईल व माहितीचे आदान प्रदान करणे शक्य होईल .यासाठी  रजिस्ट्रेशन मोफत असून केवळ वधू- वर नोंदणी साठी 100 रु .नाममात्र फी ठेवली आहे* .....
*वधू - वर सूचित ऑनलाइन फॉर्म नोंदणी स्वतः करणे शक्य नसल्यास थोरगव्हाण येथील श्री उमेश खंडू कोल्हे यांचे समर्थ सेवा केंद्र येथे जाऊन किंवा संपर्क साधून नाममात्र फी देऊन नोंदणी करावी*.......
 *दरवर्षीप्रमाणे वधू -वर सूची पुस्तक तयार केले जाईल वधू - वर यांची केलेली नोंदणी ऑनलाइन पाहता येणार नाही ती गोपनीय असेल याची नोंद घ्यावी .मात्र नामावली सूचीतील माहिती सर्व समाज बांधव ऑनलाईन पाहू शकतात* ..

*माझ्या सर्व समाज बांधवांना मी नम्र आवाहन करतो की सदरील वेबसाईटचा आपण वापर करून डिजिटल युगासोबत वाटचाल करण्यासाठी थोर सन्मित्र युवा फाउंडेशन थोरगव्हाण. यांना सहकार्य करावे*.  सदैव आपल्या सेवेत अध्यक्ष श्री उमाकांत वसंत बाऊस्कर, खजिनदार श्री विलास माधव चौधरी, सचिव श्री योगेश भागवत झोपे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य बांधव, थोर सन्मित्र युवा फाउंडेशन थोरगव्हाण.,
धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.