वाडे बस फेर्या २० एप्रील २०२३ पासुन शाळांना सुटया लागल्यानंतर बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावर फक्त भडगाव ते वाडे दुपारची दिड वाजेची बस सुरु आहे. भडगाव ते बोरनार सकाळची ९ वाजेची बस सुरु आहे. या बसेसही केव्हा वेळेवर तर कधी अवेळी धावतांना दिसतात. भडगाव ते वाडे गावांदरम्यान जवळपास १८ गावांचा समावेश आहे. लग्नसराईचा टप्पा सुरु असुन प्रवाशांना प्रवास करणे अडचणीचे ठरतांना दिसत आहे. शासनाने महिलांना ५० टक्के बससाठी भाडे जाहीर केले आहे. त्यात ७५ वर्षाच्या वृद्धांना शासनाने बस भाडे मोफत जाहीर केले आहे. मग आम्हाला बस सेवेचा लाभ का मिळत नाही? असा प्रश्नही प्रवाशी वर्गातुन होतांना दिसत आहे. लग्नसराईची धावपळ, भडगावी तालुक्यावर शासकीय कामांसह इतर कामांसाठी येण्यासाठी प्रवाशी, नागरीक, महिलांना मोठा ञास सहन करावा लागत आहे. तरी पाचोरा आगाराने तात्काळ दखल घ्यावी. भडगाव ते वाडे सायंकाळची मुक्कामे बस फेरी सुरु करावी. सकाळची ८.३० वाजता सुटणारी बस फेरी सध्या सुरु करावी.प्रवाशांची प्रवासाची सोय करावी. या मागणीचे निवेदन वाडे येथील नागरीक, पञकार अशोक महादु परदेशी यांनी भडगाव, पाचोरा आगार प्रमुखांना दिले आहे.*
याबाबत भडगाव, पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भडगाव ते वाडे मुक्कामासह इतर बस फेर्या यापुर्वी सुरळीत चालु होत्या. या रस्त्याला बस फेर्यांचे चांगले उत्पन्न मिळते. भडगाव ते वाडे दरम्यान जवळपास १८ गावातील विदयार्थी, प्रवाशांना या बस सेवेचा नेहमी लाभ होतो. माञ शाळांना २० एप्रील २०२३ पासुन सुटया लागल्या आहेत. त्यामुळे पाचोरा आगारामार्फत शालेय बसफेर्यांसह वाडे मुक्कामाची बसफेरीही २४ ते २५ दिवसांपासुन बंद करण्यात आली आहे. सध्या या मार्गावर दिवसभरातुन दोनच बस फेर्या सुरु आहेत. यात भडगाव बसस्थानकातुन वाडे दुपारची दिड वाजेची बस व भडगाव ते बोरनार सकाळची ९ वाजेची बस फेर्या सुरु आहेत. बर्याचदा या दोन्ही बस फेर्या वेळेवर येत नाहीत. कधी वेळेवर येतात. या दोन्ही बस फेर्या सुरळीत सुरु ठेवाव्यात अशी मागणी आहे. *तसेच सध्या भडगाव ते वाडे सायंकाळची मुक्कामाची बस फेरी व सकाळची ८.३० वाजेची बस फेरी तात्काळ चालु करावी. कारण प्रवाशांचे प्रवासाचे हाल होतांना दिसत आहे. लग्न सराईचे दिवस चालु आहेत. त्यात महिलांना ५० टक्के भाडे सवलत आहे.माञ प्रवाशांसह महिलांना बस सेवेपासुन वंचित राहावे लागत आहे. तरी पाचोरा आगाराने भडगाव ते वाडे सायंकाळची मुक्कामाची बस फेरी व सकाळची ८.३० वाजेची बस फेरी तात्काळ सुरु करावी. प्रवाशांची प्रवासाची सोय करावी. त्यामुळे भडगाव, नवे वढधे, जुने वढधे, कोठली, निंभोरा, देव्हारी, कनाशी, बोदर्डे, लोणपिराचे, बोरनार, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, बांबरुड प्र. ब, नावरे, वाडे, टेकवाडे बुद्रुक यासह जवळपास १८ गावातील प्रवाशांची प्रवासासाठी सोय होणार आहे. तरी तात्काळ अर्जाची दखल घ्यावी. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर पञकार अशोक महादु परदेशी यांची स्वाक्षरी आहे