भुसावळ येथील बार असोसिएशन तर्फे . न्यायालय प्रांगणात भारत रत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील न्यायालयाचे अधिवक्ता एडवोकेट जय मंगल धनराज व आश्वीन स्थूल यांचे उदबोधन रविवारी संपन्न झाले .
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर एन जाधव साहेब , न्यायाधीश पडवळ साहेब , मोरे साहेब , श्रीमती हेमा पाटील मॅडम , न्यायाधीश खंडारे साहेब ,श्रीमती एसपी न्यायाधीश , वकील संघाचे अध्यक्ष अँड.तुषार पाटील व भुसावळ शहरातील व परिसरातील वकील परिवारासहित उपस्थित होते .
या प्रसंगी प्रथम भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .
वेळी प्रमुख व्याख्याते अँड. धनराज यांनी सांगितले की संविधान सर्वाना समजविण्याची जबाबदारी विशेषता वकील बांधवांची आहे त्यासाठी . आपण विशेष प्रयत्न करावे . संविधान . स्वीकारल्या नंतर ६० वर्षानंतर सर्वासाठी शिक्षण हा कायदा आस्तीत्वात आला . या पुर्वीच कायदा झाला असता तर ६ ते 14 वर्षे वयोगटातील सगळी लेकरं साक्षर झाली असती तर आज भारताचे चित्र वेगळे असते . राज्यघटनेच्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी होण्याची गरज आहे . बाबासाहेब भाषणात अनेक गोष्टी सांगतात की हे राज्यघटना बनवावी का लागली ही राज्यघटना बनवण्यासाठी काय काय परिश्रम या घटना समितीच्या सर्व सदस्यांनी घेतली कोण कोणत्या सामना झाला करावा लागला कोणी टिका केली . कोणी मदत केली . संविधान व महापुरुषांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीत कसे जाणार प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , शिवराय , किंवा ज्योतिबा फुले हे राष्ट्र निर्माण करणेसाठी मरेपर्यंत काम करून या राष्ट्राच्या उद्धाराचे कार्य पार पाडू शकतात . आज ते नसताना आमची जबाबदारी काय . पहिली गोष्ट ही शिवराय बाबासाहेब आंबेडकर किंवा ज्योतिबा फुले आज असते तर त्यांनी काय केलं आणि आज त्यांच्या विचारावर चालण्याचे दावा करणारी आम्ही लोक कोणत्या विचाराने चालत आहोत हे लक्षात घेयासारखे आहे . संकुचित विचार वाद्यांनी बाबा साहेबांना जाती धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले या मुळे देशाचा विकास मंदावला आहे.
याप्रसंगी अँड . अश्वीन थुल यांनी आपण जाती धर्मा विळख्यात न अडकता बाबा साहेबांच्या संविधाना ला घराघरात पोहविण्याचे कार्य करावे असे आवाहन केले .
वकील संघाचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी थोर महापुरषांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आमचे कार्य सुरु ठेवणार असल्याचे सांगितले . अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश जाधव साहेब यांनी सांगितले की वकील संघाने हा कार्यक्रम उत्कृष्टपणे घेतला असून त्या ठिकाणी वक्ते जे बोलावलेले ते वक्ते खरोखर अभ्यासक आहेत आणि त्यांनी जे काही आपल्याला आज प्रबोधन केलेल्या त्या प्रबोधनावर वकील संघ निश्चितच कार्य करत राहील यात शंका नाही .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन एडवोकेट खान यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ बार असोसिएशनचे धनराज मगर , रम्मू पटेल ,पुरुषोत्तम पाटील , जास्वंदी भंडारी ,संजय तेलगोटे , राजेश कोळी , वैशाली साळवे , विश्वंभर वाणी , विजय तायडे , दीपक पाटील व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .