Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा हंडा मोर्चा



 भुसावळ शहरातील पंचशिल नगर, प्रभाग क्रमांक १८ व इतर विभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा साठी  हंडा मोर्चा काढण्यात आला .

वंचित बहुजन आघाडीचा हंडा मोर्चाची सुरुवात पंचशिल नगर येथुन झाली व रस्त्यामध्ये नगर पालिका प्रशासन येऊन मोर्चा थाबवुन निवेदन स्विकारले व समस्या जाणुन घेतल्या
वंचित बहुजन आघाडी, प्रभाग क्रमांक १८ मधिल नागरीकांच्या माध्यमातुन आपले लक्ष वेधण्यासाठी पंचशिल नगर, प्रभाग क्रमांक १८ या विभागात  नगरपालिके कडुन  होणारा पाणी पुरवठा हा अनियमीत व कमी दाबामध्ये होत असल्याने वरील विभागातील नागरीकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर विभागात मागासवर्गीय,अल्पसंख्याक,हातमजुर कष्टकरी नागरीक राहतात ,घरगुती व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात.नुकतीच डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती पार पडली जयंती मध्ये पण पंचशिल नगरवासियांना पाणी मिळाले नाही पंचशिल नगर हे भुसावळ शहराच्या मध्यवर्ती असतांना ही व भुसावळ नगरपालिका अ दर्जाची असतांना प्रभाग क्रमांक १८ मध्ये १०ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. पंचशिल नगर प्रभाग क्रमांक १८ मध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही रात्री अपरात्री पाणी येते त्यामुळे नागरिकांना खुप त्रास होतो. रमजान महिना तसेच सण उत्सवात पाणी कपात रद्द करुन नियमित व उच्च दाबाने  पाणीपुरवठा करावा या मागणी साठी  दिनांक १९/४/२०२३ रोजी सकाळी १०:००वा. वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वा मध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला तरी नगर परिषद प्रशासनाने याची नोंद घ्यावी.
अनयथा वंचित बहुजन आघाडी तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेन असा इशारा देण्यात आला आहे . याप्रसंगी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे ,महासचिव दिनेश इखारे 'वंदना अ सोनवणे महिला आ जिल्हाध्यक्षा ,राजु डोझगरदिवे,गणेश जाधव भुसावळ शहराध्यक्ष ,देवदत्त मकासरे ' मेजर शहर महासचिव बालाजी पठाडे ,दिलिप भालेराव ,बेबिताई बागुल ,
लक्ष्मिबाई सोनवणे, निवर्ताबाई साळुंके ,स्वप्निल सोनवणे ,बंटि सोनकांबळे ,अतुल पाटिल आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.