Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन गुरूंना शिष्याने केले पराभूत .

भुसावळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काल पार पडली . या निवडणुकीचा 98 टक्के मतदान झाले होते . आज निवडणुकीचा निकाल खाचणे हॉल येथे मजमोजणी होवुन जाहीर झाला असुन या निकालामध्ये भाजपचे आ . सावकारे यांच्या यांना अठरा पैकी पंधरा जागांवर विजय मिळाला आहे . तर राष्टूवादीचे आ . एकनाथराव खडसे व माज  आमदार संतोष चौधरी यांच्या पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे .
 नऊ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर संतोष चौधरी व खडसे गटांचे प्राबल्य होते परंतु संतोष चौधरी व आमदार एकनाथराव खडसे यांचे राजकारणातील  शिष्य असलेले आमदार संजय सावकारे यांनी या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव केला आहे . ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती .
 निवडून आलेले सभासद विविध कार्यकारी संस्था घटक अनिल पाटील , शिवाजी  पाटील , पितांबर सोनवणे , लिलाधर बोरोले ,कैलास महाजन , निलेश वाणी , अनिल वारके हे सात विजयी उमेदवार , इतर मागासवर्गीय गटात सोपान भारंबे , विमुक्त गटात सचिन पाटील , महिला गटात माधुरी पाटील व सुरेखा पाटील , ग्रामपंचायत जनरल गटात कैलास पाटील ,किशोर सपकाळे , ओबीसी गटात मोहन पाटील , ,ग्रामपंचायत एससी गटात दिलीप सुरवाडे,' याप्रमाणे सावकारे यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार आहेत . तर  खडसे चौधरी ' पॅनलच्या गटातील . कैलास गव्हाणे , योगेश चौधरी . व  विजय  हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत . या निवडणुकीचा आ . एकनाथराव खडसे आणि संतोष चौधरी गटांना हा मोठा धक्का मानला जात आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.