श्री क्षेत्र मेहुण येथील आदिशक्ती मुक्ताई तीर्थक्षेत्रास विकासासाठी दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताई अंर्तध्यान पावल्या होत्या संत नामदेव महाराजांच्या अभंगात वर्णन असलेल्या पुरातन सोमेश्वर मंदीर , महर्षी परशुरामाने मारलेला बाण , तापीतीर हे सर्व पुरावे असुन ही या तीर्थक्षेत्रास शासकीय निधी मिळत नव्हता . मोकळा रस्ता सुध्दा उपलब्ध होत नव्हता . वास्तविक पाहता खान्देशातील सर्वच लोक प्रतिनिधीवर मुक्ताई ची कृपा झालेली आहे . परंतु हे जागृत तिर्थक्षेत्र अनेक वर्षा पासुन विकासापासून वंचित राहिले होते . मेहुण मंदिराच्या विकास कामासाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत असून , या मागणीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील , मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र ब चा दर्जा मिळून सुमारे दोन कोटी रुपयांच्य विकास कामांना मंजुरी मिळाली आहे .तापी तीरी असलेल्या आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्रीक्षेत्र मेहून मंदिराच्या विकास कामांसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने मेहुण मंदीराचे ह .भ.प रामराव महाराज , सारंगधर महाराज , सुधाकर महाराज ,विकास पाटील ,एसटी चौधरी , पंडित चौधरी , एकनाथ हरी , सुधाकर चौधरी , जनार्दन चौधरी ,नारायण पाटील ,सुनील चौधरी आदिंनी आभार व्यक्त केले आहे .