पाटील थोरले समाजांचे भव्य वधू-वर परिचय मेळावा — 15 ऑगस्टला पुण्यात .
लेवा पाटील थोरले समाज मंडळ, लेवा प्रागतिक मंडळ (मुंबई परिसर) आणि थोर सम्मित्र मंडळ (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने एक सुसज्ज आणि पारंपरिक विचारमान्य भव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला जात आहे.
हा मेळावा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव, पुणे येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात संपन्न होणार आहे .
हा मेळावा समाजातील सुशिक्षित व स्थिरस्थावर वधू-वर तसेच त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेटीगाठी व संवादाद्वारे एकमेकांना ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित केला आहे.
"आपले कुटुंब — आपली भेट" या संकल्पनेतून कुटुंबांची ओळख वाढविणे आणि समाजातील जनसंपर्क वृद्धिंगत करणे हे प्रमुख मेळाव्या चे उद्दिष्ट आहे.
प्रशस्त हॉल आणि मोफत ओपन पार्किंगची उत्तम सोय.
वधू-वरांना प्रत्यक्ष भेटण्याची व संवाद साधण्याची संधी.
बदलत्या ट्रेंड्स, विचार व अपेक्षांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळण्याचा लाभ.
कुटुंबांची शैक्षणिक, व्यावसायिक व कौटुंबिक माहिती आदान-प्रदान करण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ. येथे उपलब्ध होणार .
नातेवाईक, मित्रपरिवार व समाजबांधवांना भेटण्याचा आनंददायी अनुभव.
कार्यक्रमाचे वेळापत्रक व सेवा
कार्यक्रम वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 3.00
नोंदणी व उपस्थिती कागदपत्रांचे वितरण: सकाळी 9.00 ते 10.00 दरम्यान.
जेवण: दुपारी 2.00 ते 3.30 (रुचकर व स्वादिष्ट स्नेहभोजन).
नोंदणी व शुल्क
इच्छुक वधू-वरांनी आपली माहिती खालील संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
वेबसाईट: https://www.lptspune.com/melava_register
नोंदणी शुल्क: ₹300/-
सर्व फॉर्म फक्त ऑनलाइन पद्धतीने 15 जुलै 2026 पर्यंत स्वीकारले जातील.
आयोजक व संपर्क
आयोजक: लेवा पाटील थोरले समाज मंडळ (पुणे), थोर सन्मित्र मंडळ (नाशिक), लेवा प्रागतिक मंडळ (मुंबई परिसर)
प्रमुख संपर्क व्यक्ती: श्री. सुरेश तुकाराम पाटील, श्री. मुकेश रामकृष्ण चौधरी, श्री. सुभाष तु. चौधरी, श्री. राजेंद्र दे. चौधरी, श्री. संजय पी. महाजन.
अन्य सहआयोजक: जनार्दन (बाळू) बा. कोलते, मनोज प. झोपे, धीरज अरविंद महाजन.
सत्यनिश्वास आणि ऐतिहासिक महत्त्व
हा मेळावा सामाजिक ऐक्य व संघटनात्मक बळकटीचा ऐतिहासिक साक्षीदार ठरू शकतो, तसेच वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबांना एक व्यासपीठ देतो जिथे ते खुल्या मनाने परीचय करू शकतात.
समाज बांधवांनी उपरोक्त वेळेत नोंदणी करून मेळाव्या चा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .