सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी— तालुक्यातील वाडे कै. सुरेश सुदाम माळी या शेतकर्याच्या शेतात मका कणसे व मका चारा कापणी करुन जमिनीवर पडलेला होता. माञ मका काढणी आधीच व चारा जमा करण्याचे नियोजन असतांना त्याआधीच अचानक शेतातुन गेलेल्या विज वाहीन्यांमुळे शार्ट सर्कीट झाल्याने मका कणसांसह चारा पिकाचे जवळपास १ एकर क्षेञावरील पिक जळुन जवळपास ८० हजारांचे नुकसान झालेले आहे. तरी विज वितरण कंपनीच्या कर्मचारी व महसुल तलाठी यांना संबंधीत शेतकरी कुटुंबाने घटनेची माहिती कळविलेली आहे. माञ अदयापही एकही संबंधीत अधिकारी वा कर्मचारी बांधावर नुकसानीची पाहणी वा पंचनामा करायला पोहचले नाहीत? त्यामुळे शेतकरी कुटुंबासह इतर शेतकरी वर्गातुन संबंधितांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी महसुल प्रशासनाने तात्काळ नुकसानीची पाहणी करुन पिक नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा. तसेच विज वितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांनी पिक नुकसानीची पाहणी करावी.
संबंधीत शेतकर्याला नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी वाडे येथील नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांमार्फत केली जात आहे. शेतकर्याच्या हाता तोंडात आलेला उत्पन्नाचा घास हिरावल्याने या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट आहे रमेश माळी, गोपाल माळी, संभाजी माळी व शेजारील शेतकरी अनिल पाटील, जंगलु माळी, उत्तम माळी आदि शेतकर्यांनी शेतातील आग विझविण्यासाठी. केळीच्या पानांनी व बादल्या, ड्रमने पाणी टाकुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. माञ बहुतांश कणसे व चारा जळुन नुकसान झालेले आहे. तरी प्रशासनाने पिक नुकसानीचा पंचनामा करावा. नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी या शेतकरी कुटुंबाची आहे.