Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात डिजिटल वित्तीय साक्षरता मार्गदर्शन संपन्न

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे डिजिटल वित्तीय साक्षरता विषयक मार्गदर्शन

थोरगव्हाण .
 डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे दि. १० मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ललित सोनार यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सुरक्षितता तसेच विविध शासकीय योजनांविषयी उपयुक्त माहिती दिली.
ह्युंडई मोटर इंडिया फाउंडेशन व हक्कदर्शक यांच्या माध्यमातून अधिकार कनेक्ट उपक्रमांतर्गत “डिजिटल वित्तीय साक्षरता (DFL)” जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांना वित्तीय साक्षरता, कल्याणकारी योजना व आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस. बी. सपकाळे यांनी केले. यावेळी वाय. जे. कुरकुरे यांनी उपक्रमाची उपयुक्तता , विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम घेण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी .के. पाटील यांनी अनुमती देऊन प्रेरणा दिली. यावेळी शिक्षक के. पी. चौधरी, जे ए चौधरी , एन. बी. चौधरी, सौ. नयना पाटील, एस. बी. सपकाळे, एस. पी. पाटील, एन. ए. देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दी  एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण सर्व सन्माननीय पदाधिकारी , संचालक यांनी याउपक्रमाचे अभिनंदन कौतुक केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.