Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात महर्षी वाल्मीक जयंती साजरी

महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे आदर्श चरित्रातून प्रेरणा घेण्याची गरज:युवराज कुरकुरे . देशमुख विद्यालयात जयंती उत्साहात साजरी .

थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात महर्षी वाल्मिकी यांच्या ऋषीतुल्य कार्याचा गौरव सांगत समाजासाठी त्यांच्या जीवनातील आदर्श मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले.

कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांनी वाल्मिकी ऋषींचे वाङ्मयीन योगदान, संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि रामायणातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी व प्रभू जय श्रीराम यांच्या नावाचा घोषणातून जयघोष केला . मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना महर्षी वाल्मिकींच्या सत्य, तप, आणि ज्ञानमार्गाचे अनुकरण करण्याचे प्रेरणादायी संदेश दिले.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात मुल्याधिष्ठित जीवनाच्या विचारांची गरज अधिक भासते. महर्षी वाल्मिकींचे जीवन आणि कार्य हे समाजाच्या संस्कारमूल्यांचे मूर्त उदाहरण आहे. अशा महान संतकवींच्या विचारांचे स्मरण तरुण पिढीला योग्य दिशा देणारे ठरते, हे या जयंती उत्सवाचे सार आहे. श्री के पी चौधरी ,सौ जयश्री चौधरी श्री एम के पाटील , श्री एस पी पाटील , श्री . जे ए चौधरी , श्री टी पी घुले , श्री .पी सी कचरे , श्री एन वी चौधरी , श्री के एम पाटील ,सौ कोमल चौधरी ' सौ . योगिता झोपे यांचे सह सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.