Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठांन तर्फे निर्माल्य संकलन .

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनंत चतुर्दशी निमित्त तापी नदीकाठी निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आले.

सालाबाद प्रमाणे दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने तापी नदीकाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे मार्फत आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी व पद्मश्री महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रमात भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूंना भुसावळ व यावल तालुक्यातील 467 श्री सदस्याद्वारे 7666 घरगुती गणेश मंडळांचे निर्माल्य संकलन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 7ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
या निर्माल्याचे लागलीच श्री सदस्यांद्वारे विलगीकरण करून त्यातील 30 टन निर्माल्याचे  वृक्षांना खत निर्मिती करण्यासाठी श्री समर्थ बैठक अट्रावल येथे पाठवण्यात आले. उरलेल्या निर्मल्याचे स्थानिक प्रशासनाच्या नियमांप्रमाणे विल्हेवाट करण्यात आली.
स्थानिक नागरिकांनी देखील विश्वासाने आपल्या जवळील निर्माल्य श्री सदस्यांकडे देत उपक्रमास सहकार्य केले त्याचप्रमाणे बऱ्याच नागरिकांनी स्वतःहून यापुढे निर्माल्य प्लास्टिक बॅगमध्ये संकलित करणार नाही असा स्वैच्छिक संकल्प केला. उपस्थित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत करण्यात आलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.