थोरगव्हाण प्रतिनिधी
थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १७ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यालयाचे विज्ञानशिक्षक श्री. एन. बी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सविस्तर सांगितला.
यावेळी त्यांनी स्वातंत्र्यानंतरही निजामशाहीच्या जोखडाखाली असलेल्या मराठवाड्याची परिस्थिती, तेथील जनतेचे हालअपेष्टे तसेच स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे झालेल्या मराठवाड्याच्या मुक्तीची कथा विद्यार्थ्यांसमोर जिवंत केली. त्यांनी विद्यार्थ्यांना या लढ्याचा अभिमान बाळगावा व त्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेमाची जपणूक करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमास विद्यालयातील जेष्ठ शिक्षक टी पी घुले शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.