ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने मा मुख्याधिकारी ,नगर परिषद भुसावळ यांना निवेदनाद्वारे शहरात निर्माल्य संकलनासाठी घंटागाडी सुरू करण्याबाबत मागणी केली .आपल्या भुसावळ शहरात घरोघरी तसेच प्रत्येक मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर निर्माल्य निर्माण होत असते. या निर्मल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने तसेच विल्हेवाट लावण्यासाठी नदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. निर्माल्य अस्ताव्यस्त पद्धतीने फेकल्या गेल्यामुळे त्याची विटंबना सुद्धा होते. या कारणास्तव ज्याप्रमाणे शहरात घंटागाडीच्या नियोजनातून कचऱ्याचे संकलन केले जाते तसेच निर्माल्याच्या संकलनासाठी आठवड्यातून किमान 1 दिवस स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून शहर व नदीचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. तसेच अस्वच्छतेतून पसरणाऱ्या रोगराईवर नियंत्रण येऊन साथीच्या आजारांवर सुद्धा नियंत्रण राखता येईल. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून निर्माल्य संकलन गाडीची व्यवस्था करावी ,अशी विनंती क्लब सदस्या द्वारे करण्यात आली .
या प्रसंगी क्लब च्या अध्यक्षा रेवती मांडे ,सचिव सीमा सोनार ,सुनीता पाचपांडे,डॉ मृणाल पाटील ,कोमल पाटील ,योगिता वायकोल्रे ,कविता पाचपांडे या ऊपस्थीत होत्या .