Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव फॅक्टरीत असलेल्या बिबट्याला जेरबंद करा . कर्मचारी दहशतीखाली

वरणगांव फॅक्टरीत असलेल्या बिबट्याला जेरबंद करा . फॅक्टरी  कर्मचारी दहशतीखाली
भा.म संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
वरणगांव फॅक्टरीत गेल्या दोन तीन वर्षापासुन बिबट्याचे पूर्ण कुटुंब राहत असुन फॅक्टरी कर्मचारी दहशती खाली असल्याचे निवेदन भारतीय मजदूर संघाने जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद व वन अधिकारी एन प्रविण यांना दिले आहे .
निवेदनात म्हटले आहे कि गेल्या दोन ते तीन वर्षापासुन अनेकांच्या नजरेस बिबट्या पडला असुन निर्माणी मधील अनेक प्राणी त्यांनी फस्त केले आहे मागे वनविभागने कॅमेरे लावले होते परंतु उपयोग झाला नाही . तीन दिवसापूर्वी काही कर्मचारी यांना बिबट्या दिसला असल्याने कर्मचारी दहशतीत आहे या कारणाने गोला बारुद उत्पादनावर परिणाम होवु शकतो तरी वन विभागाने लवकरात लवकर सर्व बिबट्यांना पिंजऱ्यात पकडून त्यांच्या अधिवासात सोडावे .
याप्रसंगी भुसावळचे आमदार संजयभाऊ सावकारे , बि एम एस युनियनचे फेडरेशनचे नेते योगेश सुर्यवंशी , भानुदास सपकाळे , राहुल कोळी , पवन निंबाळकर , व्ही. डी जगताप उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.