वरणगाव येथे सिध्देश्वर मधील गणपती मंदिरात महादेवाची पिंड व नंदीची मूर्ती विधीवत पूजा करून प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे .
राष्ट्रवादी चे नेते व समाज सेवक समाधान चौधरी व मा . नगरसेविका प्रतिभा समाधान चौधरी व रविंद्र सुभाष चौधरी यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली .
पौरोहित्या मंत्रोपचाराने विधी करून भगवान भोलेनाथांच्या पिंडीची व नंदीचे स्थापना श्री शिवाय नमस्तुभम च्या जयघोषात करण्यात आली या प्रसंगी सिध्देश्वर नगर मधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .