वरणगाव आयुध निर्माणी वसाहत मध्ये आंतरराष्ट्रीय मिलेट पाककला उत्साहात संपन्न झाली .
म्युनिशन इंडीया लिमिटेडच्या आदेशानुसार येथील कम्युनिटी हॉलमध्ये महीला कल्याण समिती व्दारा आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महाप्रबंधक पी . सी नंदा व महिला कल्याण समितीचे अध्यक्षा निबेदिता नंदा यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी अप्पर महाप्रबंधक ए के गुप्ता , संयुक्त महाप्रबंधक एम .जे शिंदे , जे डब्लू एम गणेश तिवारी , लहुजी इंगळे , महीला कल्याण समितीच्या अर्चना गुप्ता , पल्लवी मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्पर्धेत ३१ महिलांनी वेग वेगळ्या शंभर ते दीडशे वेगवेगळ्या पद्धतीच्या मिलेटचे तयार केलेले स्वादीष्ठ खादय पदार्थ तयार करून आणले होते . यात बाजरीचे, ज्वारीचे ,नागलीचे, भगरचे ' तसेच इतर धान्याच्या विविध चवीचे पदार्थ तयार करून प्रदर्शनात ठेवले होते .
याप्रसंगी निवेदीता नंदा यांनी मिलेट चे पदार्थ आरोग्यासाठी किती हितकारक आहे व धान्य आपण नेहमीच्या जेवनात का वापरले पाहीजे त्याबद्दल सांगितले , तर रिना पाटील यांनी सुद्धा कडधान्याबद्दल विविध विचार मांडून लहान मुलांना फास्ट फुड न देता धान्याचे पदार्थ द्यावे असे सांगितले ,याप्रसंगी महाप्रबंधक पी सी नंदा यांनी धान्य हे जीवनासाठी आवश्यक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा प्रयोग केला जात असून सदर धान्य हे कमी पाण्यात व नापीक जमिनीत सुद्धा उत्पन्न होऊ शकते हे सांगितले .
या कार्यक्रमात पाककला स्पर्धेत प्रथम सरीता सहारे, द्वितीय आहेरकर व तृतीय शितल धाबर्डे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले .तसेच इतर सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले .
याप्रमाणे यापुढे इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज शेख यांनी केले , तर आभार प्रदर्शन पल्लवी मुळीक यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला कल्याण समितीच्या पदाधिकारी महिला, यार्ड आणि इस्टेट विभागाचे कर्मचारी , इलेट्रीक विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
