Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा येथे उबाठा सेनेतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन

*क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन*

दिनांक २८/११/२०२४ 
मध्यवर्ती कार्यालय,पाचोरा 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

आज रोजी महान समाज सुधारक, स्त्री मुक्तीसाठी पाया रचणारे,स्त्री शिक्षण व एकूण बहुजन समाजासाठी  शिक्षणाची दारे उघडणारे क्रांतिकारक तसेच सत्यशोधक समाजाचे संस्थापक,उत्तम उद्योजक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) मध्यवर्ती कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
ज्योतिबांच्या मनुस्मृती सप्तबंदी जुगारून महिलांना गुलामीतून काढून पहिली महिला शाळा सुरू केली हा इतिहास पुन्हा उजळून निघाला.
यावेळी प्रतिमा पूजनवेळी शिवसैनिक गांगुर्डे अण्णा,अरुण तांबे, संतोष पाटील,धीरज पिहाल,दीपक सातदिवे,शुभम पाटील,योगेश पाटील उपस्थित होते.संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर योगेश पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.